VarshaTranslations मराठी

"एका कुपीतील अत्तर दुसऱ्या कुपीत आले आहे की नाही, एव्हढेच भाषांतराच्या कामी पाहावे. दोन्ही बाटल्यांची काच सारख्याच वाणाची आणि आकाराची असली पाहिजे, असा आग्रह धरण्यात काही मतलब नाही." - श्री. म. माटे

नमस्कार!


VarshaTranslations ला भेट दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

माझं नाव वर्षा पेंडसे-जोशी. मी व्यावसायिक मुक्त (फ्रीलान्स) भाषांतरकार आहे. भाषांतरकार म्हणून काम करण्यास मी २००१पासून सुरुवात केली. प्रारंभीची पाच वर्षे इंजेक्शन आणि स्ट्रेच-ब्लो मोल्डींग तंत्रज्ञान, बॅंकिंग/वित्त, आयटी/सॉफ्टवेअर इत्यादी क्षेत्रात मातब्बर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भाषांतरकार म्हणून काम करीत असताना, भाषांतर, संपादन, मुद्रितशोधन, सारांशलेखन तसेच इंटरप्रिटेशन (दुभाषी) इत्यादी जबाबदाऱ्या प्रथितयशपणे सांभाळल्या. मी जपानमध्ये तोक्यो, क्यूशू या ठिकाणी सेमीकंडक्टर्स, पॉवर सप्लाईजच्या क्षेत्रातील नामवंत जपानी ग्राहकांसमवेत काम केले आहे. २००६ सालापासून मी व्यावसायिक मुक्त भाषांतरकार म्हणून काम करत आहे. आजपर्यंत प्रमाणपत्रांपासून पेटंट्सपर्यंत असंख्य तऱ्हेचे मजकूर मी देशविदेशातील विविध ग्राहकांकरीता यशस्वीरीत्या भाषांतरीत केले आहे. भाषांतर उद्योगातील तंत्रज्ञानाचा यथोचित वापर करुन दर्जेदार भाषांतर वेळेत सुपूर्द करणे, हे माझे वैशिष्ट्य आहे.

Proz मी जपानीतून इंग्रजी भाषांतरासाठी प्रोझ.कॉमचे Proz.com Certified Pro हे सर्टीफिकेशन प्राप्त केलेले आहे. (Certified Pro हे EN 15038 या भाषांतर सेवेच्या गुणवत्ता प्रमाणावर म्हणजेच क्वालिटी स्टॅंडर्डवर आधारीत आहे.)

माझे प्रोझ प्रोफाईल इथे पाहता येईल.

याव्यतिरिक्त मी इंडीयन ट्रान्सलेटर्स असोसिएशनची सदस्य असून व ट्रान्सलेटर्सकॅफे.कॉम या भाषांतरकारांच्या जागतिक व्यासपीठाचेही मास्टर सभासदत्व घेतले आहे.

भाषा व भाषांतरक्षेत्रासंबंधी तसेच, इतर विषयांवर ललितलेखन वृत्तपत्र, नियतकालिकांमधून केले आहे. ते वाचण्यासाठी कृपया 'ARTICLES' पान पहा. तसेच, माझ्या सेवांचा लाभ घेतलेल्या माझ्या ग्राहकांची मते वाचण्यासाठी 'TESTIMONIALS' येथे टिचकी मारायला विसरु नका!

हॅपी ट्रान्सलेटींग!
भाषाविषयक सेवा

प्रकार
 • भाषांतर
 • संपादन
 • मुद्रितशोधन
 • सारांशलेखन
 • लिप्यंतर
 • ट्रान्सक्रिप्शन
 • व्हॉइस-ओव्हर
 • सबटायटलिंग

भाषा
 • मराठीतून इंग्रजी
 • इंग्रजीतून मराठी
 • जपानीतून इंग्रजी
 • इंग्रजीतून जपानी
 • हिंदीतून इंग्रजी
 • इंग्रजीतून हिंदी

प्रमुख क्षेत्रे
 • आयटी, सॉफ्टवेअर/हार्डवेअर
 • पेटंट्स
 • अभियांत्रिकी: मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, केमिकल, टेलिकम्युनिकेशन्स, इ.
 • औद्योगिक उत्पादन व तंत्रज्ञान, यंत्रे/उपकरणे व अवजारे
 • बिझिनेस, वित्त
 • आरोग्य/हेल्थ केअर
 • सर्वसाधारण: लग्न, घटस्फोट, जन्म, मृत्यू, शैक्षणिक प्रमाणपत्र, सर्वेक्षण, प्रश्नावली, पासपोर्ट/व्हिसासाठी लागणारी कागदपत्रे, व्हिजिटींग कार्ड, इ.

अधिक माहितीसाठी कृपया Projects पान पहा.

मराठी-इंग्रजी भाषांतराची काही उदाहरणे
 • कर्मचारी कार्यमग्नता सर्वेक्षण (इंग्रजीतून मराठी), भाषांतर व संपादन
 • लहान मुलांसाठी वर्तणूकविषयक तपास-सूची व बालवयातील फेफरे (एपिलेप्सी)संबंधित प्रश्नावली (मराठीतून इंग्रजी भाषांतर)
 • औद्योगिक उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरील मजकुराचे भाषांतर, संपादन व मुद्रितशोधन (इंग्रजीतून मराठी भाषांतर)
 • इंग्रजीतील क्लासिफाइड्स (छोट्या जाहिरातींच्या) संकेतस्थळाचे मराठीमध्ये स्थानिकीकरण (Localization)
 • पशुसंवर्धन - फार्ममधील प्राण्यांचे व्यवस्थापन व पाळीव प्राण्यांचे संगोपन (इंग्रजीतून मराठी भाषांतर)
 • चिकित्सालयीन चाचण्या (Clinical Trials) (इंग्रजीतून मराठी)
 • जन्म, लग्न दाखले (बर्थ, मॅरेज सर्टीफिकेट्स) आणि इतर प्रमाणपत्रे, दाखले इ. (मराठीतून इंग्रजी)
 • क्रमिक पाठ्यपुस्तकातील पाठ - भाषांतराचे मूल्यांकन (इंग्रजीतून मराठी)

वैशिष्ट्ये
 • काम वेळेवर सुपूर्द केले जाते.
 • ट्रॅडॉस स्टुडीओ २००९चा वापर केल्याने काम वेगात होते, कामात दर्जासातत्य येते.
 • ऑफलाईन (पुस्तके/शब्दकोश इ. छापील स्रोत) आणि आंतरजालीय स्रोतांचा उत्तम वापर.

दर व संपर्क

कुठल्याही भाषांतराच्या प्रकल्पाचा दर हा बऱ्याच बाबींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जो मजकूर तुम्हाला भाषांतरीत करुन हवा आहे त्या मजकुराचा विषय/क्षेत्र, पृष्ठसंख्या, मजकुराची क्लिष्टता, फाईलचा प्रकार (संपादन करण्याजोगा अथवा नाही), भाषांतर सुपूर्द करण्याची अपेक्षित तारीख इत्यादी.

माझ्याशी संपर्क साधताना तुमच्या कामाची थोडक्यात माहिती (विषय, पृष्ठांची संख्या, अपेक्षित सुपूर्द करण्याची तारीख, फाईलचा प्रकार) कळवल्यास मी प्रकल्पाच्या किंमतीचा अंदाज देऊ शकते. संपर्कासाठी कृपया Contact पानावरील फॉर्मचा उपयोग करा.Membership
Indian Translators Association ITA

My Articles
Get Quote
Full Name
Contact No
Email ID
Message
 
All fields are mandatory

Certification
ProZ.com Certified Pro! Proz